जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) | स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा सन २०२६ पासून शासनाच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २२ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये स्व. अजितदादांची जयंती साजरी करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रावेर लोकसभा जिल्ह्याच्या वतीने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली.
या भेटीदरम्यान शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना स्व. अजित अनंतराव पवार यांची प्रतिमा भेट देण्यात आली. शासनाच्या या नवीन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करत जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये स्व. अजितदादांच्या जयंतीचे आयोजन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, युवक तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, नगरसेवक निलेश कोलते तसेच ॲड. देवकांत पाटील आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.







