पुण्यातील कोरोना निर्बंध शिथिल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत घेण्यात आला निर्बंध शिथिलचा निर्णय

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : अनलॉकबाबतची नवी नियमावली सोमवारी जाहीर करण्यात आली होती. राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथील होणार होते. मात्र पुण्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम होते. या जिल्ह्यांत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू होते. या निर्णयावर पुण्यातील व्यापारी महासंघाने नाराजी व्यक्त केली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

काय आहेत पुण्यातील नवे नियम :
पुण्यातील सर्व दुकानं एक दिवस वगळता सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी
पुण्यातील हॉटेल-रेस्तराँ सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार
मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मॉल्समध्ये फक्त दोन लस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार
हॉटेल चालक आणि दुकानदारांना लशीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक
पुण्यातील सर्व उद्यानं नियमित वेळेनुसार सुरु राहणार
जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी
सात टक्क्यांच्या पुढे पॉझिटिव्हीटी रेट गेल्यास पुन्हा निर्बंध लागणार
पुणेकरांना मास्क वापरणं बंधनकारक

सात टक्केच्या पुढे पॉझिटिव्ह दर गेला तर दिलेली मुभा थांबवली येईल. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंवडकरांनी नियमांचं पालन केलंच पाहिजे. दुकानात विक्री करताना दुकानाचे मालक आणि सेल्समन मास्क वापरत नाही अशी तक्रार आहे. मुभा देत असताना कोरोना वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी. ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणात आल्यानंतर तिथे शिथिलता दिली जाईल. आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरुर या शहरांबाबतही निर्णय घेतले जातील. येथील रुग्णांचं प्रमाण कमी झालं की निर्बंध शिथिल केले जातील. याबाबतचा निर्णय पुढच्या आठवड्यात घेतला जाईल.”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलतांना सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here