अखेर नगरसेविका प्रिती सातम यांनी आरे युनिट नं 7 मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला

मुंबई(कुलाबा) (प्रमिला जाधव) – गोरेगाव येथील आरे युनिट नं.7 मधील रहिवासी जीवनावश्यक असणारे पिण्याचे पाणी प्रथम थाळीमध्ये गोळा करत त्यानंतर ते पाणी भांड्यांमध्ये जमा करून पिण्यासाठी त्यांना वापरावे लागत असे.ही रोजचीच तारेवरची कसरत करून येथील रहिवाशी त्रस्त झाले होते. या आरे युनिट नंबर 7 येथील नागरिकांना बऱ्याच दिवसापासून भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर प्रशासनाकडे नगरसेविका प्रीती साटम यांनी पाठपुरावा करून आरे परिसरातील नागरिकांना नवीन पाण्याची पाईपलाईन टाकुन पुरेसे पिण्याचे पाणी आज उपलब्ध करून दिले. यामुळे संपूर्ण आरे युनिट नंबर 7 मधील सर्वच रहिवाशी अतिशय आनंदी झाले होते. तेथील रहिवाश्यांचा आनंद पाहून मला ही समाधान वाटले.पाण्याचे पाईप पासून ते नळाला पाणी लागेपय॔त जे कष्ट केले त्याच हे प्रतीफळ म्हणजे नळाला आलेल्या पाण्याचा फवारा आणि रहिवाश्यांना झालेला आनंद म्हणजेच माझ्या कष्टाचे फळ झाले असल्याची माहिती नगरसेविका प्रीति साटम यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here