ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानूने घेतली सचिन तेंडुलकर यांची भेट

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे पदकाचे खाते उघडणाऱ्या मीराबाई चानूने नुकतीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची भेट घेतली. वेटलिफ्टर मीराबाईने सोशल मीडियावर सचिनसोबतचे फोटो पोस्ट करून ही माहिती दिली.

यावेळी सचिनने तिच्या मेडलची पाहणी करताना तिला शुभेच्छा दिल्या. मीराबाईने ऑलिंम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिननेही सोशल मिडीयावर तिचे कौतुक केले होते.

या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली. दुखापतीनंतर ज्या पद्धतीने तिने मेहनत घेत स्वतःला सावरले आणि ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकले, हे उल्लेखनीय आहे. भारताला तुझ्या कामगिरीचा अभिमान आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here