लॉटरीच्या नावाखाली सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा

पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : पिंपरी येथे आंबेडकर चौकाकडून पिंपरी गावाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यालगत असलेल्या राजश्री लॉटरी सेंटर येथे ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली जुगार अड्डा सुरू होता व काल दुपारी पावणेचारच्या सुमारास करण्यात आली.

यामध्ये 51 हजार 175 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मयूर रवींद्र जगताप (वय 31, रा. काळेवाडी), दत्‍तात्रय रघुनाथ कदम (वय 42, रा. सुदर्शन नगर, पिंपळे गुरव), गोकुळ वामन पाटील (वय 55, रा. रुपीनगर, तळवडे), रुपेश अशोक केसरवानी (वय 40, रा. यमुनानगर, निगडी), सचिन सुभाष साळुंके (वय 37, रा. शिवाजीनगर गावठाण, मनपा पाठीमागे, पुणे), विठ्ठल कचरू कांबळे वय 50, रा. विठ्ठल नगर, नेहरूनगर, पिंपरी), बाबुराव सदाशिव जांभुळकर (वय 52, रा.हिंजवडी गावठाण), काळूराम बाबू जाधव (वय 52, रा. काळेवाडी), अनिल नंदलाल राजदेव (वय 43, रा. रविकिरण सोसायटी, पिंपरी), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस कर्मचारी राजेश विठ्ठल कोकाटे यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथे आंबेडकर चौकाकडून पिंपरी गावाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यालगत असलेल्या राजश्री लॉटरी सेंटर येथे ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. ऑनलाइन लॉटरी नावाचा जुगार घेऊन ते ऑनलाइन न करता लोकांना कागदी आकड्यांच्या चिठ्ठ्या देऊन त्यावर पैसे स्वीकारले. तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हारजीतचा जुगार विनापरवाना खेळताना आरोपी मिळून आले.या कारवाईमध्ये पोलिसांनी 43 हजार 160 रूपये रोख, आठ हजार 15 रूपये किमतीचा मोबाईल फोन, असा एकूण 51 हजार 175 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कामगिरी. पोलीस आयुक्त. कृष्ण प्रकाश , अप्पर पोलीस आयुक्त , रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त , ( मुख्यालय ) सुधीर हिरेमठ , सहा . पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक. प्रसाद गोकुळे , सपोनि. डॉ . अशोक डोंगरे , पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे , पोउपनि धैर्यशिल सोळंके पोलीस अंमलदार विजय कांबळे , सुनिल शिरसाट , नितीन लोंढे , भगवंता मुठे , अनिल महाजन , जालिंदर गारे , मारुती करचुंडे , संगिता जाधव , गणेश कारोटे , राजेश कोकाटे , सोनाली माने यांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here