राज्याच्या आयुक्तांनी जारी केले आदेश
जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर निखिल ठाकूर) : राज्य उत्पादन शुल्क विभागातील राज्यातील १५० दुय्यम निरीक्षकांच्या मंगळवारी बदल्या झालेल्या आहेत. त्यात जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील सात जणांचा समावेश आहे. बाहेरुन दोन अधिकारी धुळ्यात बदलून येत आहेत. राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी हे आदेश जारी केलेले आहेत.
जळगाव येथील विकास पाटील यांची नाशिक विभागीय भरारी पथक, पाचोरा येथील दुय्यम निरीक्षक वसंत मधुकर माळी यांची कोनगाव, ठाणे येथे जळगाव येथील सीमा तपासणी नाक्याचे विजय नाईक यांची कोल्हापूर, यावल येथील केदारगीर निरंजनगीर बुवा यांची औरंगाबाद, नंदूरबार येथील शैलेंद्र दत्तात्रय मराठे यांची वैजापूर, औरंगाबाद येथे, धुळे येथील किशोर गायकवाड यांची पालघर व शहादा येथील गणपतराव अहिरराव यांची नाशिक शहर येथे बदली करण्यात आली आहे.
उल्हासनगर येथील रामकृष्ण लांजेकर व आयुक्तालयातील भरारी पथकाचे दिलीप काळेल यांची धुळे येथे बदली झाली आहे.






