भाजपा खासदाराच्या कथित सेक्स व्हिडिओमुळे गुजरातमध्ये राजकीय भूकंप; एकाला अटक

अहमदाबाद : भाजपा खासदाराच्या कथित सेक्स व्हिडिओमुळे गुजरातच्या राजकारणात भूकंप आला आहे. या व्हिडिओचा फोटो दाखवून बनासकांठाच्या आम आदमी पक्षाचे (आप) नेते माधाभाई पटेल यांनी या व्हिडिओसंदर्भात आपल्या फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यांनी पोस्टसह एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये कोणाचाही चेहरा दिसत नव्हता, पण माधाभाईंनी लिहिले होते की ते या भाजप नेत्याचा संपूर्ण व्हिडिओ १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करतील.मात्र, त्याआधी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती भारतीय जनता पक्षाचे खासदार परबत पटेल असल्याचे दावा करण्यात येत आहे. पटेल यांनी हा व्हिडीओ कोणाचा षड्यंत्र असल्याचे सांगितले आहे तर त्यांच्या मुलाने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

आप नेते मघाभाई यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये खासदार परबत पटेल पालनपूरच्या शासकीय अतिथीगृहात अश्लिल चाळे करताना पकडले गेले असल्याचे म्हटले आहे. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी परबत पटेल यांच्या मुलाने माधभाई पटेल आणि मुकेश राजपूत या दोघांविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. पटेल यांचे पुत्र शैलेश म्हणाले की, माझे वडील निर्दोष असून त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ही फेसबुक पोस्ट व्हायरल होताच भाजपा नेते आणि खासदार परबत पटेल यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली होती. व्हायरल व्हिडिओबद्दल आपल्याला जास्त माहिती नसल्याचे खासदार पटेल यांनी म्हटले. त्यांचा दावा आहे की त्यांचा आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेलिंग आणि बदनामी करण्याच्या हेतूने कोणत्यातरी व्हिडिओशी छेडछाड करून तयार करण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने परबत भाई पटेल यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. पटेल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here