१४ ऑगस्ट रोजी लोकजनशक्ती पार्टीची रेशनसाठी मशाल निदर्शने

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणालीमार्फत वितरित होणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्रसरकार कडून आलेल्या मोफत धान्न्याचा काळा बाजार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीकरीता लोकजनशक्ती पार्टीने १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता मशाल निदर्शने आयोजित केली आहेत.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या साक्षीने ही मशाल निदर्शने केली जाणार आहेत.

लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट ,सरचिटणीस के. सी. पवार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. कोविड साथीच्या काळात गरजू ,गरिबांसाठी केंद्राकडून आलेले मोफत धान्य वितरित न होता काळ्या बाजारात जात असल्याचा आरोप करून पक्षाने सातत्याने आंदोलने केली आहेत.

lokjanshakti-party-nivendan

अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे शहर व पुणे जिल्हा तालुका पुरवठा अधिकारी , शहरातील सर्व परीमंडळ अधिकारी , सर्व रेशनिंग दुकानदार यांची चौकशी करून दोषी वर कारवाई करण्यात यावी, यासाठी पक्षाने सतत पाठपुरावा केला आहे . शासकीय कर्मचारी आणि रेशन दुकानदारांची चौकशी करण्यासाठी पुण्यातील ११ परिमंडळांमध्ये ११ पथके स्थापन करण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव , पुरवठा आयुक्त त्रिभुवन कुलकर्णी यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये काढला होता

.विभागीय आयुक्त कार्यालय ,जिल्हाधिकारी कार्यालय ,आझाद मैदान अशा सर्व ठिकाणी पक्षाने निदर्शने करून पाठपुरावा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निवेदन दिले आहे,असे संजय आल्हाट यांनी सांगितले. तरीही कारवाई होत नसल्याने नाईलाजाने ‘ये आझादी झूठी है ,देश की जनता भुकी है ‘ हे शासनाला सांगण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मशाल निदर्शने करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या पत्रकात म्हटले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here