एरिया सभा मागणीसाठी १७ ऑगस्ट रोजी पालिकेत ठिय्या आंदोलन
पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : नागरिकांना पालिकेच्या निर्णय प्रक्रियेत स्थान देणाऱ्या एरिया सभेच्या नियमित आयोजनाच्या मागणीसाठी आज (शुक्रवारी ) विभागीय उपायुक्त श्रीकांत पाटील यांना विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी निवेदन देण्यात आले.
यावेळी असलम इसाक बागवान (इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप ) ,क्षेत्रसभा -एरीया सभा समर्थन मंच) इब्राहिम खान (एन ए पी एम, स्वराज आघाडी) ,सचिन आल्हाट (इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप, स्वराज अभियान), राजू सय्यद (इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप, क्षेत्रसभा (एरीयासभा समर्थन मंच) इत्यादी या चर्चेत आणि निवेदन देताना उपस्थित होते.यावेळी विभागीय उप आयुक्त श्रीकांत पाटिल यांनी या शिष्ट मंडळाशी विस्तृत चर्चा करून यावर लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. दरम्यान ,१७ ऑगस्ट रोजी पुणे महानगरपालिकेत होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या मागण्या मान्य करून निर्णय घेतला जावा यासाठी सकाळी ११ वाजल्यापासून ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे असलम बागवान यांनी सांगितले . 26 जुलै रोजीचे धरणेआंदोलन व 6 ऑगस्ट रोजी केलेले स्मरण आंदोलनास प्रतिसाद न मिळाल्याने 17 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे
महानगरपालिका मुन्सीपल अधिनियम 1949 च्या नियमांचे पालन करून कलम 29/क/2/1 नुसार क्षेत्रसभा न घेतलेल्या प्रभाग 27 चे नगरसेवक अनुक्रमे अ ब क ड. यांचा राजीनामा घेण्या संदर्भात तसेच पुणे मनपा विज विभाग, पथ, उद्यान, आकाशचिन्ह चा महसूल तसेच लाखो रुपयांची विजचोरी प्रभाग क्रमांक 27चे नगरसेवक गफुर पठाण यांनी केलेली असताना आज पर्यंत त्याच्यावर सर्व पुरावे सीसीटिव्ही फुटेज देवूनहि का कारवाई केले गेली नाही म्हणून महानगरपालिका मुन्सीपल अधिनियम 1949 च्या 36/3 नुसार पुणे मनपा च्या संबधित आयुक्त उप आयुक्त यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे .तसेच शहरविद्रपीकरण करणारी संकल्पना फलके कोणाच्या ठरावाने संमत झाली ,वॉर्डातील होणारी कामे जनतेला विचारात घेऊन केलेली आहेत की नाही,कामाच्या ठिकाणी ठेकेदार फलके न लावताच महिनोनमहिने चाललेल्या विकासकामां संदर्भातील निवेदन विभागीय उपआयुक्त यांना विधानभवन येथे देण्यात आले आणि पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविण्यात आले.






