जंतंरमंतरवरील आंदोलनातील धर्मविद्वेषाच्या आवाहन करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पाचोरा येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन

जळगाव (क्राइम रिपोर्टर जमील शेख) : आज पाचोरा येथे ०८ ऑगस्ट २०२१ रोजी दिल्ली येथे जंतरमंतर या ठिकाणी धार्मिक विद्वेष भडकवणाऱ्या व मुस्लीम समुदायाच्या संहाराचे आवाहन करणाऱ्या विरुध्द गुन्हा दाखल करणे संबंधी शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले.

जंतरमंतर-दिल्ली येथे एकाआंदोलनाच्या दरम्यान आक्षेपार्ह व जनसंहार करणाऱ्या घोषणा दिल्या गेल्या, आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला.एका विशिष्ट, समाजाला “लक्ष्य” करुन देशात धार्मिक विद्वेष निर्माण करुन त्या समाजाच्या “नरसंहाराचे” आवाहन करणारे हे समाज कंटक देशात अराजक माजवू पहात आहे. ही घटना धर्मनिपेक्ष भारतीय लोकशाहीला जागतीक पातळीवर काळीमा फासणारी तर आहेच त्याच बरोबर भारतीय संविधान आणि भारतीयदंड विधान मोडीत काढणारी आहे. त्यामुळे त्या समाज कंटकांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या १५३/अ या कलमा खाली गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

pachora-nivedan

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, कांग्रेसचे तालुकाअध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख एडवोकेट अभय पाटील, राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हा प्रवक्ते खालील देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अज़हर खान, नगरसेवक अशोक मोरे, माजी नगरसेवक नसीर बागवान, अय्युब बागवान, सामाजिक कार्यकर्ते प्रविण ब्रहाम्णे, मुस्लिम बागवान, अज़हर लुकमान खान, भिमराव खैरे, साजीद कुरैशी, मतीन बागवान,ज़हीर खाटीक, फिरोज देशमुख, बामसेफचे पुर्णकालीन प्रचारक नंदलाल आगारे, ग्रा.प. सदस्य मुखतार बागवान, हमीद शाह, रज्जु बागवान, इसराइल बागवान हजर होते।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here