लोकजनशक्ती पार्टीची रेशनसाठीची मशाल निदर्शने तूर्त स्थगित

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणालीमार्फत वितरित होणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्रसरकार कडून आलेल्या मोफत धान्न्याचा काळा बाजार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीकरीता लोकजनशक्ती पार्टीने १४ ऑगस्ट रोजी आयोजित केलेली मशाल निदर्शने तूर्त स्थगित करण्यात आली आहेत.

नव्याने रुजू झालेले अन्नधान्य पुरवठा अधिकारी सचिन ढोले यांनी या प्रकरणाची दखल घेण्याचे आश्वासन आज पक्षाच्या पदाधिकाऱ्याना दिले. लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट ,सरचिटणीस के. सी. पवार, संघटक आप्पा पाटील उपस्थित होते. कोविड साथीच्या काळात गरजू ,गरिबांसाठी केंद्राकडून आलेले मोफत धान्य वितरित न होता काळ्या बाजारात जात असल्याचा आरोप करून पक्षाने सातत्याने आंदोलने केली होती.

lokjanshakti-party-nivendan

अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे शहर व पुणे जिल्हा तालुका पुरवठा अधिकारी , शहरातील सर्व परीमंडळ अधिकारी , सर्व रेशनिंग दुकानदार यांची चौकशी करून दोषी वर कारवाई करण्यात यावी, यासाठी पक्षाने सतत पाठपुरावा केला होता .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here