कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) : कर्जत तालुक्यात सन 2008 साली गोपी रिसोर्ट प्रा.लि यां कंपनीने मौजे शिरसे आकुर्ले ता.कर्जत यां ठिकाणी 104 एकर जागा खरेदी केली. सदर जागेत गोरगरीब लोकांना स्वस्त घर देण्याचे आमिष दाखवून तानाजी मालुसरे सिटी यां नावाने गृह प्रकल्प सुरु केला होता. कालांतराने गोपी रिसोर्ट प्रा.लि या कंपनीच्या भागीदारांमध्ये वाद झाल्याने सदर प्रकल्प या कंपनीने विकत घेतला असून त्या जागेवर सदर प्रोजेक्ट प्रस्तावित आहे.
यां प्रोजेक्ट मध्ये सन 2008 ते सन 2019 यां दरम्यान 4157 इसमांनी सुमारे 135 करोड रुपयांची गुंतवणूक केली असून त्याकरिता विविध बँकद्वारे 56 करोड रुपये कर्ज घेतले आहे व इतर रक्कम रोखीने घेतली आहे. अशा प्रकारे 4157 इसमांचे सुमारे 191 करोड रुपये सन 2019 पावेतो कंपनीस प्राप्त झालेले आहेत. सन 2017 ते सन 2019 यां दरम्यान शेलट्रेक्स प्रा.लि.यां कंपनीने कंन्सट्रक्शन करण्याकरिता ECL फायनान्स, इडलवाईज हाऊस, विद्यापीठ रोड, कालिना , सांताक्रुज पूर्व मुंबई या कंपनीद्वारे सुमारे 180 करोडचे कर्ज घेतले आहे. त्याकरिता कंपनीची सुमारे एकर जमीन गहाण ठेवण्यात आली आहे. दोन्हीची बेरीज करत आता पर्यंत कंपनीत एकूण 371 करोड रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे.
एकूण 104 एकर जागेपैकी काही भागात सुरवातीला सन2008 ते सन 2013 यां दरम्यान कंपनीने काही बिल्डींग बांधल्या. परंतु त्याचे बांधकाम सुरक्षित नसल्याने त्या तोडण्यात आल्या. सध्या तळमजला अधिक दोन माळे अशा 22 बिल्डींग बांधून तयार झाल्या असून त्यात 839 फ्लॅट व शॉप आहेत. त्यापैकी 670 हे शेलट्रेक्स प्रा.लि यां कंपनीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूक दरांचे असून उर्वरित 169 फ्लॅट व शॉप हे वेगवेगळ्या लोकांनी खरेदी केलेले आहेत. तयार असलेल्या 670 फ्लॅट व शॉप यांचा संबधितांना ताबा घेण्याची ऑफर दिली असताना त्यापैकी फक्त 70% इसमांनी आपआपल्या फ्लॅट व शॉपचा ताबा घेतलेला आहे. कंपनी मध्ये गुंतवणूक केलेल्या 4157 इसमापैकी 70% ते 80 % इसमांनी फ्लॅट व शॉप चे SALE रजिस्टर अॅग्रीमेंट केलेले आहेत. सुमारे 247 इसमांनी ग्राहक निवारण मंच, अलिबाग यांच्याकडे केसेस दाखल केलेल्या आहेत. त्याबाबत कंपनीने ग्राहक राज्य आयोग हुतात्मा चौक मुंबई यांच्याकडे अपील केलेले असून 147 इसमासोबत सेटल मेंट झालेली आहे.

गोपी रिसोर्ट प्रा.लि व शेलट्रेक्स प्रा.लि या कंपनीने विविध योजना राबिवल्या होत्या. त्यात प्रामुख्याने फ्लॅट व शॉप खरेदी करण्यास येणा-या ग्राहकांच्या फायनान्स पोझिशनवर व्यवहार करण्यात आलेले आहे. कंपनीत आतापर्यंत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांपैकी 1086 लोकांनी बँक द्वारे कर्ज काढून दिलेले आहे. त्यातील सुमारे 80% ते 90% इसमांची बुकिंगची रक्कम अथवा जास्त रक्कम भरल्यानंतर बँक द्वारे झालेल्या कर्जाचे हप्ते फ्लॅट व शॉपचा ताबा देई पर्यंत कंपनी भरणार होती. बँकद्वारे कर्ज घेताना संबंधीत इसमाचे नाव कर्ज काढले असल्याने त्यांनी त्याचे चेक संबधित बँक यांना दिलेले होते. परंतु सन 2017 नंतर कंपनीने कोणत्याही ग्राहकाची रक्कम बँक मध्ये न भरल्याने पर्यायाने गुंतवणूकदारांचे बँकेत दिलेले. धनादेश बाउंस झाल्याने संबंधित बँक यांनी गुंतवणूकदारांविरुद्ध कोर्टात खटले दाखल केले आहेत. तसेच काही बँक यांनी नोटीस पाठविलेल्या आहेत.
गुंतवणूकदारांची सन 2008 पासून कंपनीत रक्कम जमा करून बँक द्वारे कर्ज मिळवून देवून देखील गोपी रिसोर्ट प्रा.लि व शेलट्रेक्स प्रा.लि या कंपनीने फ्लॅट व शॉप न देता फसवणूक केल्याबाबत सदर कंपनी व कंपनीच्या संचालकांविरुद्ध 1) गोपी रिसोर्ट प्रा.लि अँड तानाजी मालुसरे सिटी मौजे शिरसे ता.कर्जत ,2) शेलट्रेक्स कर्जत प्रा.लि मौजे शिरसे ता.कर्जत 3) एबॉय मॉरिशस 4) श्री.गणेश राजेश कृष्णन 5) जोसिलव्हा 6) डी.के. मधुकर 7) श्री.उदयसिंग वाळूंज 8)श्री.हाफिज सौरभ कॉनट्रक्टर 9)श्री.संदीप सिंग 10)श्री.सुरेश सिंग 11)श्री.अरुण आतलेकर 12)श्री.मुरारी दिनेश मुनीम 13) श्री.अनिल पांडुरंग कांबळे 14)श्री.जिनेंद्रक कन्हयालाल नाहर15)श्री.सुनील विश्वनाथ 16)श्री.रवींद्र रमेश सिनकर 17)कीर्ती मलगौडा तीमन्नागौदर 18)श्री. अनिल पांडुरंग शिंदे 19)श्री.अनिल सुभाष सावंत 20) श्री.अमेय गणेश पाटील 21) श्री.मुकेश रुद्दल पटेल, कर्जत पोलीस ठाण्यात दिनांक 10/08/2021 रोजी गु.र.जि 219/2021 भा.द.वि कलम 420, 406, 409, 465, 467, 468, 471, 120 (b) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा.पोलीस अधीक्षक सो.रायगड अशोक दुधे यांचे मार्गदर्शनानुसार अपर पोलीस अधिक्षक रायगड श्री.सचिन गुंजाळ यांच्या अधिपत्याखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.जे.ए.शेख आर्थिक गुन्हे शाखा रायगड अलिबाग हे करीत आहे.






