भूस्खलनाने हिमाचलमध्ये चिनाब नदीचा प्रवाह खंडीत

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये आज (दि.१३) लाहौल स्पितीच्या उदयपूर तालुक्यातील नालदा गावाजवळ भूस्खलन झाले. या भूस्खलनाने चिनाब नदीचा प्रवाह बंद झाला असून, नदीच्या प्रवाहातील फक्त १०ते १५ टक्के पाणी पुढे जात आहे. परिणामी नालदा गावाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालंय.

भूस्खलन झाल्यानंतर हेलिकॉप्टरने परिसराचा आढावा घेण्यात आला. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जवळच्या गावातील लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आलं असून एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान, किन्नौरमध्ये राष्ट्रीय महामार्ग ५ वर चौरा गावाजवळ बुधवारी दरड कोसळून अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत हिमाचल प्रदेश रस्ते वाहतूक महामंडळाच्या बससह अनेक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बसमधील सर्वाधिक १५ जण दगावले आहेत. राष्ट्रीय आपदा प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) आणि स्थानिक पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. अद्याप अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत असून त्यांचा नेमका आकडा समजू शकलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here