जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची संघटनेत विविध पदांवर निवड करण्यात आली आहे. कजगाव चे डॉ संजय पाटील यांची वैद्यकीय आघाडीच्या भडगाव तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तर सरचिटणीस पदी राहुल धाडीवाल यांची निवड करण्यात आली आहे.
कामगार आघाडीच्या अध्यक्ष पदी विनोद हिरे यांची निवड करण्यात आली आहे. सदरील निवड भाजप तालुका अध्यक्ष अमोल पाटील यांच्या वतीने घोषित करण्यात आली आहे. ह्या निवडी बद्दल माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खा. उन्मेष पाटील, आ. मंगेश चव्हाण, जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, भडगाव तालुका अध्यक्ष अमोल पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे व भाजप पदाधिकाऱ्यांसह विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.






