१४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी त्रासिका स्मरण दिन’ म्हणून पाळण्यात येणार

पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया ‘ट्विटर’ खात्यावरून केले जाहीर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी त्रासिका स्मरण दिन’ म्हणून पाळण्यात येणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया ‘ट्विटर’ खात्यावरून जाहीर केले आहे.

मोदींच्या म्हणण्यानुसार, १४ ऑगस्ट या दिवशी घृणा आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो भावा-बहिणींना विस्थापित व्हावं लागलं. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणाच्या निमित्तानं हा दिवस ‘फाळणी त्रासिका स्मरण दिन’ म्हणून आठवणीत ठेवला जाईल.

हा दिवस आपल्याला भेदभाव, शत्रुत्व आणि दुर्भावनेच्या विषाला संपुष्टात आणण्यासाठी केवळ प्रेरित करणार नाही तर यामुळे एकता, सामाजिक सद्भाव आणि मानवीय संवेदना आणखीन मजबूत होतील, असंही मोदींनी म्हटलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here