एरंडोल भाजपातर्फे दुष्काळ जाहीर करून कृत्रिम पावसासाठी निवेदन

एरंडोल (तालुका क्राइम रिपोर्टर वाल्मिक सोनवणे) : एरंडोल भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल तहसीलदार यांना दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत व कृत्रिम पाऊस पाडणे संदर्भात निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित एरंडोल लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी ,रवींद्र महाजन माजी नगराध्यक्ष, अशोक चौधरी जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा ,अमोल जाधव ,राजेंद्र पाटील तालुका सरचिटणीस , ॲड नितीन महाजन नगरसेवक, नरेंद्र पाटील, संजय साडी, प्रशांत महाजन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष ,वाल्मीक सोनवणे, अनिल महाजन, अखिल शेख ,धनराज पाटील,युवराज देशमुख, कल्पेश पाटील, सचिन विसपुते लोकेश महाले ,नंदलाल सोनार, प्रदीप महाजन, शुभम पाटील, अजित पाटील, रवींद्र पाटील ,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट पर्यंत सरासरी पडणाऱ्या पावसापेक्षा पेक्षा आता पर्यंत केवळ 25% च्या आसपास पाऊस पडला असून जामनेर अमळनेर , पाचोरा, भडगाव ,धरणगाव ह्या तालुक्यात 25% पेक्षा ही कमी पाऊस पडला आहे व पूर्ण जिल्ह्यात पेरणीची वेळ आलेली आहे.त्यामुळे शेतकरी अतिशय चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात जलाशय अजूनही कोरडेच असल्याने पिण्याच्या पाण्याचेही व गुरांच्या चाऱ्याचे दुर्भिक्ष निर्माण झालेले आहे
जळगाव जिल्ह्यात आत्ता पर्यंत फक्त 25% पाऊस झाला असून पीक तर मरणासन्न अवस्थेत पोहचले आहेत शेतकऱ्यांनी तिबार पेरणी केल्याने आता भविष्य पीक येण्याची अशा मावळ्याने शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी.तसेच जर लवकरच पाऊस पडला नाही तर किमान पिण्याच्या पाण्याची सोय गुरांची सोय होण्यासाठी तरी जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची आम्ही मागणी करीत आहोत

त्यामुळे जळगाव जिल्ह्यात तात्काळ कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा, पिण्याच्या पाण्याची टंचाई कुठे कुठे निर्माण होईल याचा सर्व्हे करत तात्काळ उपाययोजना करावीत, शेतकरी अत्यंत अस्वस्थ असून ते दुष्काळ जाहीर करण्यासाठी सतत प्रशासनाला निवेदन देत आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये तात्काळ तलाठी व संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून सर्व्हे करण्यात येवून लोकांना दिलासा द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here