मराठा समाजाला आरक्षण मिळण्या संदर्भात पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना निवेदन सादर

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : मराठा समाज आरक्षण मिळण्या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मराठा समाज जिल्हाध्यक्ष पी एम पाटील यांनी निवेदन दिले. ना.पाटील म्हणाले मराठा समाज आरक्षण देण्या संदर्भात मा.श्री उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री यांना विषय मांडणार असे आश्वासन दिले.

या मागणीसाठी जिल्हा अध्यक्ष पी एम पाटील सर,शिवसेना तालुका प्रमुख गजानन नाना पाटील,प.स.सभापती प्रेमराज पाटील,ज्येष्ठ समाज सेवा दामुअण्णा पाटील,माजी सरपंच रमेश पाटील भवरखेडा,मनोर पाटील पैलवान भवरखेडा,आबा पाटील,दिपक पाटील समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here