ठाकूरवाडी डोंगराळ भागातील गावठी दारुची भट्टी रसायनी पोलिसांनी केला उध्द्वस्त

पनवेल (प्रतिनिधी सुनिल राठोड) : रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वाशिवली ठाकूरवाडीत डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिसांनी शिताफीने छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टी अड्डा उध्वस्त केला.

यावेळी तयार दारु, बनविण्याचे साहित्य, रसायन तसेच गावठी हातभट्टीची तयार दारु पोलिसांना सापडली. दारु बनविण्यासाठी असलेले ड्रम पोलिसांनी पलटी करुन हातभट्टी अड्डा उध्वस्त केला. यावेळी पोलिसांना ३० हजार ५०० किमतीचे एकुण निळया रंगाचे ५ प्लॅस्टिकचे २०० लिटर क्षमतेचे ड्रम प्रत्येक ड्रममध्ये २०० लिटर प्रमाणे दारु तयार करण्याचे तांबडया रंगाचा उग्र वास येत असलेले मिश्रीत द्रव्य १ लिटर प्रमाणे ३० रुपये किमतीचे ड्रमसह किमंत अंदाजे ५०० किमतीचे लीटर क्षमतेचा अॅल्युमिनियमचा सतेला किंमत अंदाजे २०० रुपये किंमतीचा लाकडी चाटु जुना वापरता, २०० रुपये किंमतीच्या २०० लीटर क्षमतेच्या ४ पत्राच्या टाक्या, ४०२० किंमतीचा २० लीटर क्षमतेचा सफेद रंगाचा कॅन त्यास दाबाचे बुच असुन तो काढून पाहता त्यामध्ये गावठी हातभट्टीची तयार दारु प्रत्येकी २०० रुपये १ लीटर, ३५० किंमतीचे एक २०० लीटर क्षमतेची पजाची टाकी त्यामध्ये १० लीटर दारु तयार करण्याचे तांबडया रंगाचा उग्र वास येत असलेला मिश्रीत द्रव्य, ३५ हजार ५७० असा माल मिळून आला.

याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार पाटील अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here