ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : शुक्रवार दिनांक 13/08/ 2021 रोजी एक हात मदतीचा रायगड जिल्ह्यातील नेरळ, नेरळ स्टेशन, जीता गाव, आदिवासी पाडा, पोहुची वाडी, विकास वाडी या गावांमध्ये प्रत्यक्ष भाजपा चित्रपट कामगार आघाडी आणि महाराष्ट्र पोलीस गृहरक्षकदल संघर्ष समिती यांच्यातर्फे या गावांमधील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
भाजपा चित्रपट कामगार आघाडी आणि महाराष्ट्र पोलीस गृहरक्षकदल संघर्ष समिती यांच्यातर्फे घरोघरी जाऊन त्यांना लागणाऱ्या रोजच्या गरजेच्या वस्तू अंघोळीचे साबण कपड्याचे साबण तांदूळ कडधान्य लहान मुलांसाठी बिस्कीट बटाटे डाळ गव्हाचे पीक इत्यादी ग्रह उपयोगी किटस तयार करण्यात आले होते त्यासोबत लहान मुलांचे कपडे व महिलांसाठी साड्या ड्रेस पुरुषांचे कपडे या सर्व वस्तू अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी त्यांना मदत म्हणून वाटप करण्यात आल्या.

यावेळी भाजपा चित्रपट आघाडी ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ सुषमा ठाकूर महाराष्ट्र पोलीस गृहरक्षक दल श्री सिद्धार्थ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश बनसोडे तसेच चित्रपट कामगार आघाडी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री अशोक पवार साहेब, महिला ठाणे शहर अध्यक्ष सौ. नताशा सोनकर ठाणे शहर सरचिटणीस कौशिक पाटील सुनील गायकवाड सौ विद्याताई शिंदे, राणी कोरी रायगड जिल्हा सरचिटणीस अंकुश दुर्गे आणि संतोष धुळे यांच्या मदतीने वाटप करण्यात आले.







