पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : एमपॉवर ग्रूपतर्फे दि११ते १४ ऑगस्ट रोजी ऑनलाईन अवेअरनेस सेमीनारचे आयोजन करण्यात आले होते .
आजकाल धकाधकीच्या काळात खुप साऱ्या गोष्टींची काळजी , एकाच वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागणे तसेच काही मेंदूतील गुंतागुंतीमुळे असहय असे मानसिक आजार बळावत आहेत . अल्झाईमर आणि त्यापुढील पायरी म्हणजे डिमेझिया कि ज्यावर आजतरी कोणतेही ठोस औषध उपलब्ध नाही , असे आजार कसे पळवून लावायचे त्याविषयी ह्या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले .
अल्झाईमर समजून घेताना काय करावे काय टाळावे , त्यातील टप्पे तसेच अल्झाईमर व डिमेन्शिया मधील फरक ,लक्षणे निदान , मेमरी लॉस चॅलेंजेस इं वर शास्त्रीय उपाय , डायट , न्युरो एक्सरसाईजेस ह्यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यशाळेसाठी ॲड . अनिशा फणसळकर , डॉ . वैजयंती पटवर्धन , डॉ . माधवी खरे तसेच डॉ . निलेश पळसदेवकर ह्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले .
कार्यशाळची सांगता दिं १४ .८ .२०२० रोजी झाली . कार्यशाळेमुळे खुप माहिती व सखोल ज्ञान मिळाल्याचे सर्व अभ्यासार्थी यांनी विशेष नमूद केले. पुढील काळात अशाच प्रकारच्या कार्यशाळा भरवण्यात येणार असून त्यासाठी आपणही सहभागी होऊ शकता, असे ॲड . अनिशा फणसळकर यांनी कळविले आहे.






