पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : सणसवाडी (ता. शिरुर) येथे दरोड्याच्या तयारीत थांबलेल्या पाच युवकांना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने गावठी कट्टा, जिवंत काडतूस तसेच दोन दुचाकींसह काही साहित्य जप्त करुन जेरबंद केले आहे. मन्या उर्फ अर्जुन राजेंद्र भंडारे, संतोष श्रीमंत लांडे, महादेव हरिश्चंद्र शिंदे, सिद्धार्थ राजू कांबळे, अमोल रमेश गोटे असे शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पुणे: सणसवाडी (ता. शिरुर) येथे दरोड्याच्या तयारीत थांबलेल्या पाच युवकांना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने गावठी कट्टा, जिवंत काडतूस तसेच दोन दुचाकींसह काही साहित्य जप्त करुन जेरबंद केले आहे. मन्या उर्फ अर्जुन राजेंद्र भंडारे, संतोष श्रीमंत लांडे, महादेव हरिश्चंद्र शिंदे, सिद्धार्थ राजू कांबळे, अमोल रमेश गोटे असे शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांना पाहून दोघे जण पळून जाऊ लागले; पण…
सणसवाडी येथील प्रतिक्षा बियर शॉपी समोरील मोकळ्या जागेत १४ ऑगस्ट रोजी काही संशयित तरुण दरोड्याच्या तयारीत थांबले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती. शिक्रापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे, पोलिस हवालदार जितेंद्र पानसरे, पोलिस नाईक श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, महेंद्र पाटील, रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, पोलिस शिपाई जयदीप देवकर, निखील रावडे, किशोर शिवणकर, राहुल वाघमोडे, लक्ष्मण शिरसकर यांसह आदींनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली. काही युवक संशयितपणे त्या ठिकाणी दिसून आले. दरम्यान, पोलिस आल्याची चाहूल लागताच सदर ठिकाणचे युवक सैरावैरा पळू लागले असताना पोलिसांच्या पथकाने सर्वांना त्या ठिकाणी पकडले. त्यांची झडती घेतली असताना त्यांच्याकडे एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस, लोखंडी कटावणी, लोखंडी स्क्रूड्रायवर, पाच मोबाईल, दोन दुचाकी वाहने जप्त केली आहेत.
येरवडा पोलिसांनी ‘त्या’ चोरटयांना केले गजाआड…
दरम्यान, शिक्रापूर पोलिसांनी मन्या उर्फ अर्जुन राजेंद्र भंडारे (वय २१), संतोष श्रीमंत लांडे (वय २३), महादेव हरिश्चंद्र शिंदे (वय २१), सिद्धार्थ राजू कांबळे (वय २६), अमोल रमेश गोटे (वय २६, सर्व रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे व पोलिस नाईक सागर कोंढाळकर हे करत आहेत.






