अत्यावश्यक सेवेतील रिक्षा चालक महिला व अंगणवाडी सेविका , समाजसेविका यांना श्री अविनाश पालवे (एसीपी) वाहतूक शाखा ठाणे यांच्या मार्फत कोरोना योद्धा गौरव ने सन्मानित

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : 15 ऑगस्ट निमित्त MSF तथा महाराष्ट्र पोलीस गृहरक्षक संघर्ष समिती संचालक मा श्री सिद्धार्थ डी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना कालखंडामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या समाजसेविका ,अंगणवाडी सेविका व झाशीची राणी युनियन मधील महिला रिक्षा चालक यांना वाहतूक शाखा ठाणे पोलीस उपायुक्त मा श्री बाळासाहेब पाटील आयपीएस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यावश्यक सेवेतील कोरोना योद्धा गौरव सन्मानपत्र मा श्री अविनाश पालवे साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा ठाणे यांच्या मार्फत सर्व महिला रिक्षाचालक यांना कोरोना योद्धा गौरव ने सन्मानित करण्यात आले तसेच 15 ऑगस्ट कार्यक्रमा निमित्त तीन हात नाका येथील सिग्नल शाळेतील लहान मुलांना बिस्किट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

या कार्यक्रमाची रूपरेषा मा श्री धीरज पार्सेकर निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, मा श्री अमोल माने अध्यक्ष महाराष्ट्र राज्य , मा श्री अमोल पटेकर युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ,ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री सतीश बनसोडे, सौ प्रीती खाणेकर वाहतूक जिल्हा अध्यक्षा , सौ शोभना ओवाळ महिला अत्याचार अध्यक्षा , युनियन अध्यक्षा वाहतूक सौ सरोज पोटफोडे यांच्या मार्फत करण्यात आली

कोरोणा योद्धा गौरव सन्मानपत्राने चौफेर वार्ता न्यूज चॅनेल च्या संपादिका सौ कल्याणी किरण भांगरे, अत्यावश्यक सेवेतील महिला रिक्षा चालक सौ सरोज पोटफोडे, सौ उषा विजय पवार, सौ राजकुमारी मुरगड, सौ वैशाली मोरे, सौ अनिता इंगले ,सौ सुरेखा कोळी, सौ प्रमिला जावळे, सौ राजश्री सावंत, सौ आरती जाधव, सौ सोमी खाडे ,सौ गीता पवार ,सौ मनीषा देवकर ,सौ आरती जाधव ,सौ सविता पाखरे सौ गीता राणे ,सौ रेशमा अन्सारी सौ जयश्री अहिरे ,सौ अनिता इगे, सौ ज्योती मोघल , सौ लक्ष्मी कदम, सौ वनिता भोळे यांना सन्मानी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here