स्वातंत्र्यदिनानिमित्त राहात्यात मोफत कॅन्सर तपासणी आणि जनजागृती अभियान

राहाता (प्रतिनिधी) – आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स डॉक्टर सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व साईधाम हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. स्वप्नील माने यांच्यावतीने मोफत कॅन्सर तपासणी व जनजागृती अभियान महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात राबविण्यात येते, त्याचा Cancer Detection and Awareness programme 279 वे आरोग्य शिबिराचे साईधाम हॉस्पिटलच्या माध्यमातून राहाता येथे ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजन करण्यात आले होते.

यावेळी येथील गाडेकर हॉस्पिटलचे डॉ स्वाधीन गाडेकर , डॉ निर्मला गाडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले ,तसेच या कार्यक्रमावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे जनरल सेक्रेटरी गणेश वाघचौरे यांची विशेष उपस्थिती होती, यावेळी डॉ स्वप्नील माने यांनी उपस्थित महिला व नागरिकांना आहार,विहार व कॅन्सर रोगावर लक्षणे व औषध उपचार यावर चर्चा सत्रात मार्गदर्शन केले,

यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विक्रांत वाघचौरे, आंतरराष्ट्रीय संचालक डॉ अरुणकुमार शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज शिंदे ,राष्ट्रीय उपाध्यक्ष भारत चवरे , राष्ट्रीय सरचिटणीस गणेश वाघचौरे, राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी अशोक लांडगे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केतन पाटील, महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी विवेक साळवी, मुंबई विभाग लीगल एड प्रमुख अॅड.अभय सोडिये, नितीन सोनवणे, अध्यक्ष पोलीस ग्रीवीयंन्स सेल महाराष्ट्र राज्य ,जब्बार शेख अध्यक्ष अल्पसंख्याक सेल महाराष्ट्र राज्य , तसेच अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री इरफान शेख यांनी कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here