रोटरी क्लब द्वारा आयोजित रक्तदान शिबिरात ८९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

हिंगणघाट (प्रतिनिधि आसिफ कुरेशी) : ७५ व्या स्वतंत्र दिवस अमृत महोत्सवा निमित्य रोटरी क्लबने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात ८९ व्यक्तिंचे रक्तदान करुन स्वातंत्र दिन साजरा केला.शिबिराला आमदार समिरभाऊ कुणावार यांनी भेट देऊन रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक केले तसेच या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की हे वर्ष आपल्यासाठी अत्यंत कठिन असे आहे अनेक प्रकारचे साथीचे कोरोना व डेंगु सारखे आजार घेऊन आले.आहेत त्यासाठी रुग्णांना रक्ताची नितांत आवश्यकता असते म्हणुन आपले हे कार्य वंदनिय आहे.

तसेच हिगंणघाट उपविभागिय अधिकारी श्रिमती शिल्पा सोनाळे यांनीही भेट देऊन रोटरी क्लबच्या समाज सेवेबाबत अनेक कार्यक्रमाबाबत जानून घेतले व समाज सेवेच्या व्रताची प्रशंसा केली मी आपल्या कार्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.यात इनरव्हिल क्लब ही सहभागी होते इनरव्हिल क्लब सदस्यांनीही रक्तदान करुन सहभाग नोंदविला.

शिबिराचे प्रकल्प अधिकारी म्हनुन केदार जोगलेकर व किशोर चंदानी यांनी काम पाहिले. रोटरी क्लबचे चार्टर प्रेसीडेंट ड़ा.मुखी ,मुरली लाहोटी , रोटरी क्लब अध्यक्ष रो. प्राध्यापक जितेद्रं केदार ,सचिव पुडंलिकजी बकाने, जितेंद्र वर्मा, प्रा.अशोक बोंगिरवार, प्रा.माया मिहानी, गौरव बत्रा, सुरेश चौधरी, शशांक खांडरे, इनरव्हिल क्लब अध्यक्षा .संतोष डालीया पुर्वाध्यक्षा सुचिता मुंधडा .शोभा बोथरा,.वर्षा बोंगिरवार यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here