धरणगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सहाय्यक साहित्यासाठी तपासणी शिबीराचे आयोजन

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : ना.गुलाबराव पाटील, पालकमंत्री जळगाव जिल्हा यांच्या आमदार विकास निधीतुन धरणगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सहाय्यक साहित्य उपकरणे उदा. तिनचाकी सायकल, व्हीलचेयर, कुबड्या, वॉकर, काठी, जयपुर फुट, कॅलीपर्स, कर्णयंत्रे इ. उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

सहाय्यक साहित्य वाटपापुर्वी संबधीत दिव्यांग व्यक्तींची तपासणी व मुल्यमापन शिबीराचे आयोजन दिनांक: 16 ऑगष्ट 2021, सकाळी 10 वाजता, ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे करण्यात आले आहे.

या तपासणी शिबिरातंर्गत लाभार्थ्यांची तपासणी झाल्यानंतरच पात्र दिव्यांग व्यक्तीस साहित्य उपलब्ध करण्यात येईल. तरी वरील प्रमाणे धरणगाव तालुक्यातील व्यक्तींनी शिबीरात उपस्थित रहावे असे आवाहन मा. पालकमंत्री महोदय , पी.एम.पाटील सर, महिला अध्यक्ष प्रतिभा पाटील , अक्षय महाजन , संजय पाटील , संजू दामोड़े वासुदेव वाघ, अक्षय मुथा, राजू चौधरी ,राजेंद्र फुलपगारे,रवी काबरा( दिव्यांग विकास महासंघ) यांच्या वतीने करण्यात येत आहे. शिबीराच्या ठिकाणी येतांना दिव्यांगाचे प्रमाणपत्राची 4 झेरॉक्स प्रत, आधार कार्डच्या 4 झेरॉक्स प्रत, 4 फोटो आदी कागदपत्रे आणणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here