शिर्डी नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

शिर्डी (प्रतिनिधी) : देशभरात रविवारी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे.आज शिर्डी येथे नगरपंचायतचे वतीने नगराध्यक्ष शिवाजी(भाऊ)गोंदकर यांनी ध्वजारोहण करून अभिवादन केले,

यावेळी नगरपंचायत मधील कोरोना योद्धयांचा सन्मान करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष गोंदकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,आज आपण स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा करीत असून आज कोरोना महामारीने जगभरात हाहाकार माजला असताना या कोरोना योद्धयांनी खूप जबाबदारीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम केली ती अत्यन्त कौतुकास्पद आहेत.त्यामुळेच आज शिर्डीत कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे,तरीही नागरिकांनी, काळजी घ्यावी,लसीकरण करून घ्यावे,गर्दी केली करू नये,आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी ,गर्दी टाळावी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन नगराध्यक्ष शिवाजी(भाऊ)गोंदकर यांनी यावेळी केले.

shirdi-flag

मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या,उपनगराध्यक्ष सचिन कोते यांनी। सर्वांचे आभार मानले,याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आबा गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे,भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शब्बीर सय्यद,गटनेते अशोक गोंदकर नगरसेवक सुजीत गोंदकर, मंगेश त्रिभुवन, जगन्नाथ गोंदकर, दत्तात्रय कोते,रविंद्र कोते,नगरसेविका सौ.अनिताताई जगताप ,मा नगरसेवक विजय जगताप,ताराचंद कोते,हाजी बिलाल,राजू गोंदकर,प्रमोद गोंदकर,भरत चांदोरे ,अमोल गायके,विकास कोते आदींसह ग्रामस्थ व नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here