कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या गेल्या अनेक दिवसांपासून ५० हजारांच्या आत आहे. कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका अजून कायम आहे. त्यामुळेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

परराष्ट्र व्यापार महासंचलनालयानं (डीजीएफटी) याबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार ‘कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटला निर्यातबंदीच्या यादीत टाकण्यात आले आहे. हा निर्णय त्वरित लागू करण्यात येत आहे,’ असं डीजीएफटीनं अधिसूचनेत नमूद केलं आहे. तिसरी लाट आल्यास भारताला मोठ्या संख्येनं कोरोना चाचण्या कराव्या लागतील. त्याची तयारी म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार काल देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ कोटी २२ लाख २५ हजार ५१५ वर पोहोचली. आतापर्यंत ४ लाख ३१ हजार ६४२ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला आहे. ३ कोटी १४ लाख ११ हजार ९२४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्याच्या घडीला ३ लाख ८१ हजार ९४७ जणांवर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here