मुंबई (महाराष्ट्र संपादक सुनिल पाटील) : रविवार दिनांक 15 ऑगस्टला साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 वी जयंती व स्वातंत्र्य दिना निमित्त लहुजी शक्ती सेना तर्फे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
अंधेरी एमआयडीसी येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे नितिन गायकवाड- (उ प जिल्हाअध्यक्ष मुंबई ), आकाश शिंदे – ( विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष ), मुकेश वाघमारे – ( शाखा अध्यक्ष क्रं 2), महादेव शिंदे -( शाखा सचिव ) हे आयोजक होते.

तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी सदस्य राजकुमार राज, गणेश जगताप, संजय जाधव यांनी परीश्रम घेतले.






