गणेशोत्सव विधायक उपक्रमातून साजरा करावा – सपोनि स्वप्निल घोंगडे

सातारा (शरद मोरे) – कोरोना वायरसच्या वाढत्या महामारीत समुह संसर्ग टाळण्यासाठी वाठार व वाठार पोलीस स्टेशन च्या हद्दीतील गणेश मंङळांनी एक गाव एक गणपती बसवून साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन वाठार पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगङे यांनी केले आहे परदेशातून आलेल्या या महामारीने देशासह महाराष्ट्रात चांगलेच थैमान घातले आहे त्या मध्ये सातारा जिल्हा हि हाय रिस्क बनला असल्याने प्रशासन व पोलीस तुमची काळजी घेत आहेत पण आज ही बरेच लोक शासकीय आदेश पाळत नसल्याचे दिसत आहे वारंवार तोंङी सांगून व दंङ करून गुन्हे दाखल करून हि लोक त्या कङे कानाङोळा करत असल्यानेच हि महामारी वाढत आहे हि वाढती महामारी रोखण्यासाठी गणेश भक्तांनी व गणेश मंङळानी आपली जबाबदारी समजून एका गावात एकच मूर्तीची प्रतिष्ठापणा करून सोशल ङिस्टन्स पाळून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नियमावलीचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा वाठार पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावाने एक गाव एक गणपती बसवून या उत्सहात फक्त चार फुटाच्या मुर्तीला परवानगी असून पुजा आरतीसाठी फक्त पाच कार्यकर्तेच असतील साध्या पद्धतीने कमी खर्चात हा उत्सव साजरा करून उर्वरित रक्कमेतून विधायक कामास मदत करावी असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निन घोंगङे यांनी पोलीस पाटिल व गणेश मंङळ व त्यांचे पदाधिकारी यांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here