डिसिल्वा हायस्कूल येथील लसीकरण शिबिरास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : एच एन रिलायन्स हॉस्पिटलच्या माध्यमातून दादर येथील डिसिल्वा हायस्कूल मध्ये आयोजित कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिरास पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे यांनी भेट दिली.

पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे यांनी शिबिराची पाहणी करून उपक्रमास शुभेच्छा दिल्या. तसेच वैद्यकीय पथक आणि उपस्थित नागरिकांशी संवाद साधून कोविडबाबतच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. आमदार सदा सरवणकर, मनीषा कायंदे, माजी मंत्री दिवाकर रावते, नगरसेविका प्रिती पाटणकर, महापालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर आदी यावेळी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईत विविध ठिकाणी खाजगी हॉस्पिटल्सच्या सहकार्याने कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिरांचे आयोजन केले जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने एच एन रिलायन्स हॉस्पिटलच्या माध्यमातून दीड लाख नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्याअंतर्गत डिसिल्वा हायस्कूल येथे आयोजित या शिबिरात तीन हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here