अनिल देशमुखांचे वकील इंदरपाल सिंग यांनी स्पष्ट केली भूमिका
मुंबई (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर अजय कल्याणे) : ईडी विरोधातील कारवाई थांबविण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका स्वीकृत झालेली आहे, या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर ईडीसमोर हजर होऊ, असे उत्तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे चिरंजीव ऋषीकेश यांचे वकील अॅडव्होकेट इंद्रपाल सिंग यांनी आज ईडीच्या समन्सला दिले आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत ईडीनं ५ वेळा समन्स बजावले आहेत. पाचवं समन्स मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी बजावलं होतं. आज त्यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, आज देखील अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर नेमकी अनिल देशमुख चौकशीसाठी का हजर होत नाहीत आणि कधी होणार? याविषयी चर्चा सुरू असताना आज ईडीच्या कार्यालयात आलेल्या अनिल देशमुख यांच्या वकिलांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
https://www.facebook.com/BulandPoliceTimes/videos/204263534921104/
अनिल देशमुखांना ईडीसमोर हजर राहता येणार नसल्याचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे वकिल इंदरपाल सिंग ईडीच्या कार्यालयात आले होते, त्यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
We asked ED to wait until our case is heard at SC. We've told ED, in our letter, that we'll appear before them after SC order comes. We're cooperating: Ex-Maharashtra HM Anil Deshmukh's lawyer Inderpal Singh
Deshmukh was summoned in connection with alleged money laundering case. pic.twitter.com/h6z9QlTN2J
— ANI (@ANI) August 18, 2021
पीएमएलए कायद्यातील तरतुदींमुळे कोर्टाने अनिल देशमुख यांच्यासह विविध प्रकरणांतील जवळपास ४० याचिकाकर्त्यांच्या दिलासा याचिका फेटाळल्या होत्या मात्र त्याच वेळी सीआरपीसीतंर्गत कायदेशीर हक्क बजावण्याचा मार्ग खुला असल्याचं ही म्हटलं होते. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केल्याप्रमाणे अनिल देशमुख, ऋषीकेश देशमुख यांना सीआरपीसी अंतर्गत कायदेशीर हक्क बजावण्याचा मार्ग खुला आहे. त्यामुळे आधी सुप्रीम कोर्टात आमच्या खटल्याची सुनावणी होऊ द्या, मग आम्ही ईडीसमोर हजर राहू आणि पूर्ण सहकार्य करू असं ईडी प्रशासनाला सांगून त्यांच्याकडून वेळ मागून घेतल्याचं अॅड. सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.






