यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास तत्वत: मान्यता – कामगार मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : महाराष्ट्रात जवळपास साडेनऊ लाख यंत्रमाग आहेत. तर यंत्रमागाशी निगडीत साडेचार लाख कामगार असुन ते असंघटीत कामगार म्हणुन गणले जात असल्याने आजपर्यंत त्यांना कोणतेही लाभ मिळत नाही. अनेक वर्षापासून यंत्रमाग कामगारांची यंत्रमाग कामगार महामंडळ व्हावे, अशी मागणी प्रलंबित होती. त्यानुसार यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास तत्वत: मान्यता देण्यात येत असल्याची माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्रालयात राज्यातल्या यंत्रमाग मालक संघटना व कामगार संघटना तसेच वस्त्रोद्योगातील तज्ज्ञ मंडळींच्या उपस्थितीत बैठक झाली.

या बैठकीसाठी कृषी मंत्री दादाजी भुसे , आमदार प्रणिती शिंदे , आमदार अनिल बाबर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार सुभाष देशमुख, आमदार मुनीफ इस्माईल, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, विकास आयुक्त (असंघटीत कामगार) डॉ.अश्विनी जोशी, कामगार आयुक्त सुरेश जाधव यांच्यासह मदन कारंडे,माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार नरसिंह आडम, अमित गाताडे, सतीश कोष्टी, विनयजी महाजन , महादेव गौड, बंडुपंत मुसळे, राजीव पारीख, सुनील शिंदे, उदयसिंग पाटील, कामगार नेते दत्ता माने, भरमा कांबळे, तसेच मालेगाव, भिंवंडी, सोलापूर, सांगली, व इचलकरंजी येथील मालक संघटना व कामगार संघटनेचे प्रतिनिधी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here