जम्मू काश्मीरच्या कटरा भागाला भूकंपाचे धक्के

जम्मू (ऑल इंडिया उपसंपादक राजन चौधरी) : केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये आज पहाटे भूकंपाचा जोरदार हादरा बसला. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल मोजण्यात आली.

गुरुवारी पहाटे ५.०८ वाजता जम्मू काश्मीरमधल्या यात्रेकरूंत प्रसिद्ध असलेल्या कटरा भागाला भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर परिसरातील नागरिकांचा थरकाप उडाला. परंतु, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारच्या जीवितहानी किंवा वित्तहानीची बातमी अद्याप समोर आलेली नाही.

उल्लेखनीय म्हणजे, ऑगस्ट महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या अगोदर ४ ऑगस्ट रोजी राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. पहाटे ४.०० वाजल्याच्या दरम्यान भूकंपाचा हादरा बसत असल्याचं जाणवल्यानंतर नागरिक भीतीनं घराबाहेर पडले होते. या भूकंपाची तीव्रता ५.२ रिश्टर स्केल मोजण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here