संघटना वाढीसाठी सकारात्मक व विस्तृत विचार गरजेचे !!

    – कुबेर जाधव
    समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक
    1.तोकडा अभ्यास, सखोल अभ्यास न करता मतप्रदर्शन करणे. वस्तुस्थिती विचारात न घेणे.
    2.वर्तमान घडामोडीचे अज्ञान.
    3.चळवळीबाबत चिंता आणि तळमळ जास्त, परंतु प्रयत्नांत कमतरता.
    4.सर्वसमावेशक भूमिकेचा अभाव
    5.सांघिक भावनेचा अभाव.
    6.वैयक्तिक कामे करण्याची धडपड.
    7.संघटनेचे म्हणणे सोयीप्रमाणे मानुन,तशा पद्धतीने वाटचाल करने ,
    8.वास्तवतेचे भान विसरून , स्वप्न पहाण्यात धण्यता मानण्यात वेळ घालवणे
    9.जिंकू शकतो यांवर विश्वास नसणे.
    *10. सतत मानापमानामध्ये झुरत राहणे .
    11.जबाबदारी स्वीकारायला स्वतः हुन पुढे न येणे.
    12.सुसंवादाचा अभाव.
    *13. युध्द् वअतितटीच्या प्रंसगी लपून बसणे व युध्द झाल्यावर १४) काम कमी व फुशारक्या ज्यास्त *
    15.बोलण्यात आणि प्रत्यक्ष वागण्यात तफावत असणे.
    16.काम करणा-यावर सतत टिका टिपणी करणे, स्वतः मात्र जबाबदारी न स्वीकारणे.
    *17 )कम्फर्ट झोनमध्ये काम करणे.
    18.स्वतः चे दैनंदिन रुटिन न बिघडविता बदल करण्याची भाबडी इच्छा बाळगणे…
    19. नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा ठेवणे परंतु त्याचे आदेश न पाळणे.
    20.सहजशक्य नसलेले ध्येय निवडणे आणि सोपी कामे न करणे.
    21.दुस-याकडून त्यागाची अपेक्षा ठेवणे, स्वतः मात्र सुरक्षित रहाणे.
    22.एकमेकांच्या चांगल्या गुणांचा सन्मान न करणे.
    23.आपल्याच विचारांची टिमकी वाजविणे व इतरांनी केलेल्या चांगल्या कामांची दखल न घेणे.
    24.आपल्या नेतृत्वा बद्दल आदर न बाळगणे आणि सतत दोष काढत रहाणे.
    25.संघटनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास नसणे.
    26.संघटनेत कार्य करण्यासाठी इच्छाशक्तीचा अभाव असणे.
    27.पराकोटिचा आणि अनावश्यक अहंकार असणे
    28.सर्व काही सहज आणि संघर्ष न करता मिळावे अशी समजूत असणे.
    29.सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्नांपेक्षा व्यक्तिगत प्रश्नांना अधिक महत्त्व देणे ,
    30.ऐन महत्वाच्या वेळी बहाने करणे ,व वेळ मारून नेणे

    ज्यांना संघटनशक्तीचे महत्व कळते, इतरांना सहकार्य आणि मदत करण्याची इच्छा असते, दुःखी आणि कष्टी लोकांचे दुःख दूर करण्याची इच्छा असते, ज्यांना संघटीत राहून सामाजिक शक्ती निर्माण करण्याची इच्छा असते, जे विचार करतात, चिंतन करतात, मंथन करतात, ज्यांचेकड़े संयम (Patience) असते अशीच माणसे संघटनेत टिकतात. व पुढे जातात

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here