चोपडा (प्रतिनिधी मिलिंद वाणी) : शेतकरी कृती समिती,जळगांव चे जिल्हा समन्वयक,सामाजिक कार्यात अग्रणी,कोरोना काळात तालुक्यातील रुग्णांसाठी अद्यायावत सेवा उपलब्ध करुन देण्याबरोबरच ऑक्सिजन प्लांट निर्मीतीसाठी व ऑक्सिजन सिलेंडरसाठी तसेच इतर सुविधा प्रशासनास लोकवर्गणीच्या माध्यमातून संकलन करण्यात पुढाकार घेतल्या बद्दल तसेच २०१९ च्या सातारा,सांगली व २०२१ कोकण पुरग्रस्त भागात भरीव मदतनिधी पाठविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नुकताच त्यांनी केलेल्या सेवा कार्या बद्दल संवेदनाशील शेतकरी नेते एस.बी.पाटील यांचा जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील (मंत्री- पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,महाराष्ट्र राज्य) तसे जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी अभिजितजी राऊत (जिल्हाधिकारी-जळगांव) यांचे शुभहस्ते त्यांनी केलेल्या निरपेक्ष कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
त्यानिमित्ताने त्यांचे देवेंन्द्र भास्कर पाटील (मा.संचालक- ग.स,सोसायटी,जळगांव तथा सरचिटणिस- जळगांव जिल्हाअखिल.भारतीय प्राथमिक शिक्षक संघ) तसेच मंगेश रमेश भोईटे (मा.तज्ञसंचालक- ग.स.सोसायटी,जळगांव तथा अध्यक्ष- चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक संघ जि.जळगाव) आदींनी अभिनंदन केले आहे






