पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय सरावरील संशोधन संधी ‘ विषयावर वेबिनारला चांगला प्रतिसाद मिळाला.डॉ. रिपूरंजन सिन्हा, राकेश मित्तल यांनी मार्गदर्शन केले.
संशोधनाची गरज जगभर वाढत असून मानवी प्रगतीला पुढे नेण्यासाठी संशोधनाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन डॉ.रिपूरंजन सिन्हा यांनी केले. विविध विद्याशाखांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाच्या संधी असून भारतीय विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत, असे प्रतिपादन राकेश मित्तल यांनी केले. या वेबिनारला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला.







