चौकशीसाठी गैरहजर राहिल्याने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना चौकशी आयोगाने ठोठावला २५ हजारांचा दंड

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग पुन्हा एकदा चौकशी आयोगासमोर गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त न्यायमूर्ती के यू चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगाने परमबीर सिंग यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आता पुराव्यांच्या नोंदीसाठी समिती २५ ऑगस्ट रोजी बैठक घेणार आहे. दरम्यान, दुसऱ्यांदा गैरहजर राहिल्याबद्दल परमबीर सिंग यांना दंड ठोठावण्यात आला होता. यापूर्वी जूनमध्ये समितीने सिंगला हजर न राहिल्याबद्दल ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात परमबीर सिंह यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एकसदस्यीय समितीची स्थापना केली होती. तसेच समितीने परमबीर सिंग यांना हजर राहण्याची शेवटची संधी दिली आहे. परमबीर सिंग यांनी समिती आणि समितीने पाठविलेल्या समन्सला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती परमबीर सिंग यांचे वकील संजय जैन आणि अनुकुल सेठ यांनी समितीला दिली.

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर २३ ऑगस्टला उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे सांगून समितीच्या सुनावणीला स्थगिती मागितली. त्यांनी समितीची सुनावणी २३ तारखेच्या पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here