महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सिंहगड पर्यटक निवास – पर्यटकांच्या सेवेत

पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने अजरामर झालेल्या सिंहगडावर वास्तव्य करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पुर्वी बांधलेल्या पर्यटक निवासाचे नुतनीकरण आणि श्रेणीवाढ करण्याचे नियोजित होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ऐतिहासिक किल्ले सिंहगडावर 32 गुंठे इतकी जमीन आहे. सदरच्या जमिनीवर महामंडळाकडुन पर्यटक निवास बांधण्यात आले होते. सदरचे पर्यटक निवासाची दुरुस्ती आणि श्रेणीवाढ करणे आवश्यक असल्याने सदरच्या पर्यटक निवासांची कामे महामंडळामार्फत करण्यात आली आहेत.

पर्यटक निवास सिंहगडाच्या इमारतीची श्रेणीवाढ करताना अस्तित्वातील इमारतीमध्येच 2 सुट, 1 व्ही. आय. पी. सुट, 1 लोकनिवास, व्यवस्थापक कक्ष, उपहारगृहआणि डायनिंग यांची सुविधा करण्यात आली आहे. सदरचे 2 सुट आणि 1 व्ही.व्ही.पी.सुट वातानुकुलीत करण्यात आले असुन सदरच्या सुटमध्ये आधुनिक स्वच्छतागृह तयार करण्यात आले असुन आकर्षक सिलींगसह आधुनिक फर्निचर बनविण्यात आले आहे. सदरच्या ठिकाणी 1 महीला आणि 1 पुरुषांसाठी अशा 2 लोकनिवासांची सोय असुन एका वेळी प्रत्येकी 8 पर्यटक येथे राहण्याचा आनंद घेवु शकतात. सदरच्या पर्यटक निवासास सुरक्षेसाठी दगडी संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे.

एकुण उपलब्ध जागा – 32 गुंठे, निवासी खोल्या (ए.सी.) – 2 सुट, व्ही. आय. पी. सुट (ए.सी.) – 1 सुट. डॉरमेटरी (लोकनिवास – महीला) – 1. (8 बेडेड) डॉरमेटरी (लोकनिवास – पुरुष) – 1. (8 बेडेड) तंबुनिवास – 3 युनिट. (प्रस्तावित) रेस्टॉरंट – 1 युनिट डायनिंग – 1 युनिट स्वागतकक्ष – 1

उपरोक्त प्रमाणे एकावेळी साधारणपणे 35 पर्यटकांची सोय या ठिकाणी करण्यात आली असुन रुचकर भोजनासाठी उपहारगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. सदरच्या प्रकल्पाचे काम जानेवारी 2021 मध्ये पुर्ण करण्यात आले आहे. तदनंतर अंतर्गत सजावट आणि पर्यटक सोयीसुविधा यांची कामे जुन 2021 मध्ये पुर्ण करण्यात आली आहेत. सिंहगडावर महामंडळाचे संग्रहालय आणि मर्दानी खेळांसाठी ओपन ॲम्पीथिएटरही आहे. सदरच्या ठिकाणी विविध ग्रुपकडुन मर्दानी खेळ आणि कला यांचे आयोजन आगामी काळात करण्यात येणार आहे. या पर्यटक निवासाचे लोकार्पण मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शुभ हस्ते व्हीडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे दि. 17/08/2021 रोजी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here