एरंडोल (प्रतिनिधी महेंद्र पाटील) : आज सिद्धेश्वर मा वि पिंपळकोठा बु येथे 2021 मधील इ 10 वीच्या गुणवंत विद्यार्थी, मेघा मनोज पाटील- 93:80%, भाग्यश्री महेश बडगुजर- 91:30%, तृप्ती संजय पाटील – 88:00% आणि इतर 85 % पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या 7 विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या प्रेरणेने आणि प्रशासकीय अधिकारी मा डी बी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा सुनिल गरुड, प्रमुख पाहुणे अप्पासाहेब रविंद्र पाटील, भाऊसाहेब चंद्रसिंग पाटील( शाळा समिती सदस्य ) बापूसाहेब एस आर पाटील( मा सभापती कृ उ बा, शाळा समिती सदस्य), दादासाहेब आर टी पाटील, अध्यक्ष, एरंडोल ता. मुख्या. संघ, अण्णासाहेब एम के मराठे, दादासाहेब आर एस सानप, नानासाहेब भाईदास पाटील ग स संचालक, महेंद्र मोरे, सरपंच, पिंपळकोठा, पत्रकार अप्पासाहेब महेंद्र पाटील, भैयासाहेब मंगेश पाटील आणि मुख्याध्यापक व सर्व स्टाफ उपस्थित होते.
सूत्रसंचालन आर डी पाटील व सुनिल वाघ यांनी स्वागतगीत व आभार मानले.






