विवाह समुपदेशन करणे काळाची गरज; अँड. अनिशा फणसळकर यांचे निवेदन

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : आज (दि.२०) रोजी बुलंद पोलीस टाईम्स पुणे विभाग यांचेवतीने अँड. अनिशा फणसळकर -उपसंपादक ( पुणे विभाग ) यांनी पुणे जिल्हा विधिसेवा प्राधिकरण पुणे सचिव सावंत यांना निवेदन दिले .

विवाहपूर्ण समुपदेशन गरजेचे आहेच पण विवाह ठरवण्यापूर्वी समुपदेशन करणेही आजचे काळात गरजेचे आहे . भारतात सर्वप्रथम गोवा राज्याने ह्याबाबत सुचना जारी केली असून त्यानुसार कार्यवाही होत आहे .

nivedan-anisha-fansalkarpolicetimes-nivedan

आपले राज्यात सध्या वाढलेले घटस्फोटांचे प्रमाण पाहता अशी तरतुद आपल्याकडे देखील होणे गरजेचे आहे . त्याकरिता सदर निवेदन अनिशा फणसळकर ह्यांनी विधि सेवा सचिव मा . सावंत सो . ह्यांचेकडे निवेदन दिले . मा सचिव ह्यांनी त्याबाबत सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here