अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपंग विभागाला लागली आग,दैव बलवत्तर,जीवितहानी नाही

अलिबाग-सोगावकर : रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे आहे. रुग्णालयात अपंग विभागाला बुधवार दि.१८ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास आग लागली होती, सुदैवाने मोठी दुर्घटना होता होता टळली, आगीत एक संगणक जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज आहे.

आग लागलेल्या अपंग विभागाच्या वरच्या मजल्यावर मुलींचे वसतिगृह आहे, आग लागल्याचे सदर मुलींच्या लक्षात येताच मुलींनी घाबरून त्वरित बाहेर धाव घेतली,त्यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता, या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण अपंग विभागाच्या आगीत एक संगणक जळून खाक झाला तसेच अपंग विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सदर आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर मयूर पाटील, करण केळुसकर, अनिकेत नाईक, सुयोग या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तसेच एका सुरक्षा रक्षकाने आपल्या जीवाची पर्वा न करता आग विझवली व वरच्या मजल्यावर राहणाऱ्या मुलींचे जीव वाचवण्यात यश आले. यापूर्वीही रुग्णालयात स्लॅबमधील प्लास्टर पडणे,स्लॅब गळणे आदी प्रकारच्या दुर्घटनेनंतरही प्रशासन जागे होत नाही,याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here