औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : जिल्ह्यात काल (दि. २१) १९ जणांना (मनपा ०५, ग्रामीण १४) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष ४४ हजार १५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
काल एकूण १६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष ४७ हजार ८४६ झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार ५२६ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 164 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. मनपा (03), घाटी परिसर (1), मयूर पार्क (1), अन्य (1), ग्रामीण (13), औरंगाबाद (2), गंगापूर (3), खुलताबाद (1), वैजापूर (7), मृत्यू (02), घाटी (02), 1. 24, स्त्री, सोबलगाव, 2. 64, पुरूष, टाकळी अंबड, पैठण.






