पुणे (महाराष्ट्र उपसंपादक वासंती देवळे) : क्षेत्रसभा समर्थन मंच, इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय या संस्थांच्या वतीने ‘शहरी भागातील आरोग्य समस्या, त्यावर उपाय योजना आणि एरिया सभेचे महत्व या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
डाँ प्रदिप आवटे ( राज्य सर्वेक्षण अधिकारी) , डॉ.कल्पना बळीवंत (आरोग्य विभाग पुणे मनपा) हे मार्गदर्शन करणार आहेत.२३ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता हा वेबिनार होणार आहे.
देशातील नागरिकांचे आरोग्य , यामधिल 74 वी घटना दुरुस्ती मधिल नागरीकांना मिळालेले हक्क आणि अधिकार यावरही चर्चा होणार आहे. असलम इसाक बागवान सूत्रसंचालन करणार असून अल्लाउद्दीन शेख यांनी संयोजन केले आहे. https://us02web.zoom.us/j/81820691613?pwd=cnVGWDJQUFdHL2tuZms0OFFMVEV4Zz09 या लिंकद्वारे सहभागी होता येणार आहे. 818 2069 1613 हा मिटींग आयडी असून 431631 हा पास कोड आहे.






