पनवेल (प्रतिनिधी विनया मेढेकर) : पनवेलमध्ये मोटार सायकल चोरीची आणखी एक घटना समोर आली आहे. नविन पनवेल अत्यंत वर्दळीच्या साई बाबा पँलेस सेंव्टर 10 मध्युन अत्यंत सहजपणे मोटार चोरुन नेली. मोटार पार्क करुन गेला, तेवढ्या वेळातच मोटार सायकल कोनीतरी पळवून नेली.
पनवेल मध्ये गुन्हेगारी हा अत्यंत गंभीर विषय बनलाय. त्यातच ही मोटार सायकल चोरीची घटना समोर आली आहे.मोटार सायकल मालकाने पोलिसांना या घटनेबाबत तातडीने माहिती दिली. पोलिसांनी घटनेची नोंद करुन चौकशी सुरु केली आहे. २०आँगस्ट रोजी ही घटना घडली आहे
पोलिसांच्या माहितीनुसार, अमित दीलीप घोरपडे असं मोटार सायकल मालकाच नाव आहे. त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. हिरोहोंडा कंपनीची स्पेलेंडर प्लस मोटार सायकल क्र MH06 /V 9941काळ्या रंगाची सोसायटी पार्किग केली होती अशी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करत तपास पोहवा/ साळवी खादेश्वर पोलीस ठाणे यानी सुरु केला






