नव्या राष्ट्रीय विक्रमासह भारताच्या शैली सिंगने देशाला वर्ल्ड अंडर २० अँथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पटकावले रौप्यपदक

नैरोबी : भारताच्या शैली सिंगने वर्ल्ड अंडर २० अँथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कमाल केली असून लांब उडीत शैलीने देशाला रौप्यपदक जिंकून दिले. शैलीचे सुवर्णपदक केवळ एका सेंटीमीटरने हुकले.

झांसीच्या शैली सिंगने ६.५९ या नव्या राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदक जिंकले. ती भारताची दिग्गज अँथलेटिक्स अंजू बेबी जॉर्जच्या बेंगळुरू येथील अकादमीत सराव करते. या स्पर्धेत स्वीडनच्या १८ वर्षीय माजाने ६.६० मीटर सह सुवर्णपदक जिंकले. या चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक जिंकणारी शैली तिसरी भारतीय खेळाडू आहे.

या स्पर्धेत एक वेळ अशी होती जेव्हा शैली सुवर्णपदकाच्या शर्यतीत सर्वात पुढे होती. पण ज्युनियर युरोपियन चॅम्पियन असलेल्या माजाने चौथ्या प्रयत्नात ६.६० इतकी लांब उडी मारली आणि सुवर्णपदक पटकावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here