मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कथित मनी लाँडरिंग प्रकरणातील कारवाई थांबण्याची चिन्हे नाहीत. पाच वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर हजर झालेले नाहीत.
दरम्यान, आज अंमलबजावणी संचालनालय अनिल देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.
Alleged money laundering case against former Maharashtra Home Minister Anil Deshmukh: Enforcement Directorate (ED) to file a chargesheet today against the former minister's aides Kundan Shinde and Sanjeev Palande. #Mumbai pic.twitter.com/HhlI7LgujT
— ANI (@ANI) August 23, 2021
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईमध्ये ईडीनं आत्तापर्यंत अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याभोवतीचा ईडीचा फास अधिकाधिक आवळला जात आहे.






