अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : आज दि. २४ ऑगस्ट रोजी शिवसेना अलिबाग तालुक्याच्यावतीने शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मा. आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे यांना अटक करण्यासाठी निदर्शने करण्यात आली.
यावेळी रा.जि.प. विरोधीपक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजाभाई केणी, विधानसभा संघटक सतिश पाटील जिल्हा खजिनदार सुरेश म्हात्रे उप तालुका प्रमुख प्रकाश पाटील सुरेश घरत तालुका खजिनदार अजित पाटील शहर प्रमुख संदिप पालकर,मुन्ना कोटीयन विभाग प्रमुख शंकर गुरव, योगेश जुईकर, सुबोध राऊत,पृथ्वीराज पाटील अरून कवले व पदाधिकारी, महीला आघाडी च्या जितेश्री पाटील विद्या गावड शिल्पा घरत युवासेना पदाधिकारी शिवसैनिक यांची उपस्थिती होती.

नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे नारायण राणे यांना आटक व्हावी म्हणून एस.पी ऑफिस अलिबाग येथे जाऊन पोलिस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आले तसेच भारतीय जनता पार्टी च्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.






