अयोध्येला राममंदिर भूमिपूजनास जाणाऱ्या महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराजांनी घेतली नाथाभाऊंची भेट

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – अयोध्या श्रीराम जन्मभूमी दिनांक 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंदिर भूमिपूजन कार्यक्रमात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष तथा सतपंथ आश्रम फैजपूर येथील महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले असून तापी-पूर्णा संगमावरील पवित्र जल व संत मुक्ताबाई समाधी स्थळ श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर येथील पवित्र माती सोबत नेण्यासाठी आज महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज, खासदार रक्षाताई खडसे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्रजी फडके, श्री संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील ह भ प रविंद्र महाराज हरणे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून संकलित करण्यात आले. यानंतर सर्व मान्यवरांनी माजी मंत्री एकनाथरावजी खडसे यांची सदिच्छा भेट घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here