पर्यावरणपूरक उद्योगास अनुदान देण्यासंदर्भात अभ्यास करणार – पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : राज्यशासनाने महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी केली असून येत्या काळात सिंगल यूज प्लॅस्टिक मुक्त करण्याचा निर्धार राज्यशासनाने केला आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर करुन विविध प्रकारचे साहित्य आणि इतर उत्पादन निर्मिती करणाऱ्या उद्योगासंदर्भातील प्रस्तावाबाबतचा आणि त्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबतचा अभ्यास करण्यात येईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

पर्यावरणपूरक उद्योगास शासनस्तरावर अनुदान मिळण्यासंदर्भात बैठक मंत्रालयात पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पर्यावरण व वातवरणीय बदल विभागाच्या अधिकाऱ्यांसह सुभाष मालपाणी उपस्थित होते. राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, प्लॅस्टिकचा वापर करुन विविध पूरक उद्योगधंदे सुरु करता येत असले तरी याबाबत पुरेसा अभ्यास विभागामार्फत करण्यात येईल.

श्री.मालपाणी यांनी यावेळी राज्य शासनाच्या विविध विभागांचा निधी मिळण्यासाठी पात्रता प्रमाणपत्र मिळविणे कठीण असल्याचे, याशिवाय नियमित निधी न मिळता यासाठी विलंब लागतो, असे नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here