परमबीर सिंग खंडणी प्रकरण : संजय पुनामिया याला अटक

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : मुंबई तसेच ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हयात ठाणेनगर पोलिसांनी संजय पुनामिया याला मंगळवारी अटक केली आहे. त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

केतन तन्ना तसेच सोनू जालान यांच्या तक्रारीवरुन ३० जुलै रोजी परमबीर सिंग यांच्यासह पोलीस उपायुक्त दीपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त एन. टी. कदम, निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि पुनामिया आदी २८ जणांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

परमबीर सिंग, पुनामिया यांच्यासह पाच जणांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यातही यापूर्वी खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. याच गुन्हयात पुनामिया याला कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी त्याला कोपरी पोलिसांच्या ताब्यातून ठाणेनगर पोलिसांनी घेतले. या प्रकरणातील पूनामिया याच्यासह देवेंद्र आणि अंकित भानुशाली यांचा अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वीच न्यायालयाने फेटाळला असून प्रदीश शर्मा, विकास दाभाडे आणि सुनिल देसाई यांनी आपला अटकपूर्व जामीनअर्जही यापूर्वीच मागे घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here